ओळख

आज शुक्रवार आणि ऑफिसला कार घेऊन जाणार म्हणून मेघना खूप खुश होती. शुक्रवार तसाही कामाच्या घाई मध्ये लवकर निघून जातो आणि  लगेचच विकेंड सुरू होतो या विचारात ती घरातून निघाली.

 आज एसी न लावता, थंड खेळती हवा अनुभवत, ती आपल्या ऑफिसला पोहोचली.  इतके वर्ष गाडी  चालवून  ती तरबेज झाली होती पण पार्किंगची वेळ आली की अजूनही ती थोडी घाबरायची. त्यामुळे  पार्किंग मध्ये पोहोचली की एखादी ऑफिस गेटच्या जवळची जागा ती पाहायची आणि आपल्या पद्धतीने ती गाडी  पार्क करायची. जेव्हा मेघना आपल्या गाडीतन उतरून ऑफिस कडे चालायला निघाली तेव्हा तिची एकटीची गाडी उलट्या दिशेने उभी आहे आणि बाकी सगळ्यांच्या गाड्या उलट्या दिशेने उभ्या आहेत. आता या गोष्टीची लाज बाळगावी  की हसू  यावं हे तिला कळेना. पण स्वतःवरच हसत ही गोष्ट टाळायची..
******

 सुरेश एकदा फोनवर बोलता बोलता ऑफिसच्या पार्किंग लॉटमध्ये गेला..  तिथे फेऱ्या घालत असताना फोनवर  बोलता बोलता त्याचं मेघनाच्या गाडीकडे लक्ष गेलं.  आणि त्याच्याही मनात तोच विचार आला मी सगळ्या गाड्या एका दिशेने  उभ्या आहेत पण ही एकच गाडी आहे जी उलट्या दिशेने  उभी आहे. हे बघून त्याला हसू आलं.  एकदा मित्रांसोबत असताना त्यांनी हा किस्सा शेअर केला. आणि त्यावर असं म्हणाला, "मला खरंच एकदा या व्यक्तीला भेटायचं आहे."
*******

"सर,  आपल्या सॉफ्टवेअर मध्ये जो  प्रॉब्लेम आला आहे त्याच्यासाठी आपल्याला टेक्निकल मदत लागणार आहे. मी खूप प्रयत्न केला पण आता कदाचित टेक्निकल हेल्प लागेल. त्याच्याशिवाय होणार नाही. आधीच आपल्याला बराच उशीर झाला आहे हा प्रॉब्लेम फिक्स करण्यासाठी. आपण कोणाशी बोलू शकतो?" सुरेश आपल्या मॅनेजरची सॉफ्टवेअर बद्दल झालेल्या बिघाडा बद्दल बोलत होता.
"हो चालेल, मग आपण डेव्हलपरशी लगेच बोलून घेऊया." असं म्हणत मॅनेजरने  टेक्निकल टीम मध्ये फोन केला.
" मेघना का?  बरं, पण लवकर पाठवशील?  आधीच एक अख्खा दिवस फुकट गेलाय काल. आता अजून नाही थांबू शकणार. आम्हाला लवकरात लवकर गरज लागेल तिची." असं म्हणत त्यांनी फोन ठेवला आणि सुरेश ला म्हणाला, "मेघना म्हणून एक  डेव्हलपर आहे.  त्या पंधरा-वीस मिनिटात येतील. त्या प्रॉब्लेम फिक्स करतील असं वाटतंय."
"चालेल, मी बोलून घेतो. सर थँक्यू." असं म्हणत सुरेश  मॅनेजरच्या केबिन मधून बाहेर पडला.

 थोड्याच वेळात मेघना आणि सुरेश ची ओळख झाली आणि सुरेशने तिला सगळा प्रॉब्लेम नीट समजावून सांगितला. त्यावर मेघना  म्हणाली, "मला प्रॉब्लेम समजून आलाय पण तरी मला सिस्टम बघावी लागेल. मी तुम्हाला एका तासामध्ये सांगते की या गोष्टीला फिक्स व्हायला किती वेळ लागणार आहे, चालेल?" मेघाने विचारलं
"हो चालेल."
"मी इथेच बसून काम केलं तर चालणारे दुसरीकडे कुठे बसू?" मेघनाने विचारलं.
"बसा ना इथेच.  तसंही 100% लोकं ऑफिसला येत नाहीत. तुम्ही ऑफिस तसं थोडं रिकाम आहे. तुम्ही बसा,  मी आपल्यासाठी कॉफी घेऊन येतो." असं म्हणत तू निघून गेला.

  मेघना लगेच आपल्या कामाला  लागली. सुरेशने  तिच्यासाठी गरम आणलेली कॉफी तिच्या डेस्कवर ठेवली आणि काहीही न बोलता तो आपल्या डेस्कडे आपलं काम करायला निघून गेलं. अर्ध्या तासाने त्याने  मेघनाकडे  वळून पाहिलं तेव्हा तिच्या कामाचा स्पीड बघून आणि तिची हुशारी बघून तो थक्क झाला. त्याला आता खात्री वाटू लागली की ही मुलगी आपला प्रॉब्लेम नक्की फिक्स करेल.

 या विचारात तो आपल्या लॅपटॉप कडे वळला आणि आपलं काम करू लागला.  पुढच्या अवघ्या काही मिनिटात निघणार नाही त्याला हाक मारली आणि सांगितलं की प्रॉब्लेम फिक्स झालाय.
"काय? काल अख्खा दिवस वाया घालवला या प्रॉब्लेम मागे. तुम्हाला तेव्हाच सांगायला हवं होतं! तुम्ही जीनियस आहात." सुरेश आनंदाने म्हणाला.
"तसं काही नाही. साधा सिस्टम बग होता तो काढला मी. चला  मॅनेजर्सना सांगू." मेघना म्हणाली.

*******

 मेघना आणि सुरेशची आता चांगली मैत्री झाली होती..  एकदा सुरेश  कार पार्किंग मध्ये सकाळी पोहोचला तेव्हा त्याच्या बाजूला अजून एक  कार उभी राहिलेली  त्याने पाहिली. पण  पाहतो तर काय, ती गाडी उलटी उभी होती. सुरेशने गाडी बाहेर येऊन पाहिलं आणि तो या पुढचा कुठलाही विचार करणार इतका त्याने त्या गाडीतून मेघनाला बाहेर पडताना पाहिलं.
" गुड मॉर्निंग  सुरेश"
"गुड मॉर्निंग"
"काय झालं? माझ्या कारकडे असा का बघतोयस?"
"काही नाही,  मला हे कार मॉडेल खूप आवडतं.  नाईस कार." असं म्हणत सुरेशने आपला हसू आवरलं.

 लिफ्ट मध्ये असताना त्याला आपल्या विचारांवर हसू आवरेना. 'मला ज्या व्यक्तीला खरोखर भेटायचं होतं ती इच्छा पूर्ण झाली', या विचाराने त्याला अजूनच गंमत वाटू लागली.

Comments