ओळख
आज शुक्रवार आणि ऑफिसला कार घेऊन जाणार म्हणून मेघना खूप खुश होती. शुक्रवार तसाही कामाच्या घाई मध्ये लवकर निघून जातो आणि लगेचच विकेंड सुरू होतो या विचारात ती घरातून निघाली. आज एसी न लावता, थंड खेळती हवा अनुभवत, ती आपल्या ऑफिसला पोहोचली. इतके वर्ष गाडी चालवून ती तरबेज झाली होती पण पार्किंगची वेळ आली की अजूनही ती थोडी घाबरायची. त्यामुळे पार्किंग मध्ये पोहोचली की एखादी ऑफिस गेटच्या जवळची जागा ती पाहायची आणि आपल्या पद्धतीने ती गाडी पार्क करायची. जेव्हा मेघना आपल्या गाडीतन उतरून ऑफिस कडे चालायला निघाली तेव्हा तिची एकटीची गाडी उलट्या दिशेने उभी आहे आणि बाकी सगळ्यांच्या गाड्या उलट्या दिशेने उभ्या आहेत. आता या गोष्टीची लाज बाळगावी की हसू यावं हे तिला कळेना. पण स्वतःवरच हसत ही गोष्ट टाळायची.. ****** सुरेश एकदा फोनवर बोलता बोलता ऑफिसच्या पार्किंग लॉटमध्ये गेला.. तिथे फेऱ्या घालत असताना फोनवर बोलता बोलता त्याचं मेघनाच्या गाडीकडे लक्ष गेलं. आणि त्याच्याही मनात तोच विचार आला मी सगळ्या गाड्या एका दिशेने उभ्या आहेत पण ही...